भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विकास करावा; आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचना

चंद्रपूर येथील माता महाकाली आमची दैवत आहे. यामुळे येथील विकासकामांत लोकांच्या सूचना अभिप्रेत आहे. येथे राज्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांचीही संख्या मोठी आहे.

    चंद्रपूर (Chandrapur).  माता महाकाली आमची दैवत आहे. यामुळे येथील विकासकामांत लोकांच्या सूचना अभिप्रेत आहे. येथे राज्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांचीही संख्या मोठी आहे. त्यांच्या सोयीसुविधा लक्षात घेत भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामे करावी, अशी सूचना विकास आरखडा सादरीकरण दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.

    आमदार जोरगेवार म्हणाले, याप्रसंगी उपस्थितांनी अनेक महत्वाच्या सूचना करण्यात आल्या. यातील योग्य सूचना या आराखड्यात कार्यान्वित करण्यात आल्यामुळे अनेक कामे पुरातत्व विभागाच्या हद्दीत करण्यात आली आहे. त्या कामांसाठी पूरातत्व विभागाने अडथळा निर्माण केला नाही. मात्र लाखो लोकांचे श्रध्दास्थान असलेल्या माता महाकाली मंदिराच्या कामासाठी पूरातत्व विभाग अडथळा निर्माण करत असल्याने आमदार किशोर जोरगेवार यांनी संताप व्यक्त केला.

    दरम्यान आयोजित कार्यक्रमात करण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचनांमधील 64 फुटांचा ध्वज 81 फुटांची माता महाकालीची मुर्ती गाळे धारकांना मोठी दुकाने यज्ञ कुंड तयार करणे यासह इतर सूचना या आराखड्यामध्ये कार्यन्वित करण्यात आल्या. तसेच या कामाची कमीत कमी खर्चामध्ये देखभाल करण्यात यावी. येथील खुल्यामंचावर वर्षभर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यावे, नागरिकांना माता महाकालीच्या आरतीचे थेट दर्शनघेता यावे या करिता नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.