प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कोरोना कालावधीत शासनामार्फत सर्वेचे काम करण्यात आले. या कामाकरिता जिल्हा स्तरावरून लाखो रुपयांचा निधी भद्रावती तालुक्याला वितरित करण्यात आला.

    भद्रावती (Bhadravati).  माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कोरोना कालावधीत शासनामार्फत सर्वेचे काम करण्यात आले. या कामाकरिता जिल्हा स्तरावरून लाखो रुपयांचा निधी भद्रावती तालुक्याला वितरित करण्यात आला; परंतु अद्यापही सर्वेमध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना हा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला नाही.

    काही कर्मचाऱ्यांचे मानधन वितरण केलेले असून शिक्षकांना अद्यापही मानधन मिळालेले नाही. सदर निधी वितरणाची कार्यवाही त्वरित व्हावी, या मागणीचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी यांना प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष शंकर मिरे, सरचिटनिस कमलाकर मेश्राम, रविकांत टोंगे, श्रीकृष्ण गुजरकर, प्रभाकर मेंगरे, शुद्धोधन मेश्राम, विठ्ठल ताटघरे, किशोर चंदनखेडे, ताराचंद शेंडे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.