प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मारहाण झालेले आणि करणारे सर्व आरोपी मिंडाळा गावातीलच रहिवासी आहेत. यावेळी महिलांना लाथा बुक्क्या तर अशोक याला काठीने मारहाण करण्यात आली.

    चंद्रपूर (Chandrapur) : जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून संशयावरून बहीण-भाऊ आणि त्यांच्या आईला मारहाण (beaten up) करण्यात आली आहे. नागभीड तालुक्यातील (Nagbhid taluka) मिंडाळा गावात (Mindala village) ही घटना घडली आहे. अशोक कामठे (40) आणि यशोदा कामठे (38) अशी मारहाण झालेल्या बहीण-भावाची नावे आहेत. या मारहाणीनंतर आईचे इंदिराबाई कामठे (70) यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे.

    मारहाण झालेले आणि करणारे सर्व आरोपी मिंडाळा गावातीलच रहिवासी आहेत. यावेळी महिलांना लाथा बुक्क्या तर अशोक याला काठीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी सर्व पाच जणांना अटक केली.

    ही अटक जादूटोणा कायद्यानुसार नोंदविलेल्या गुन्हानंतर करण्यात आली आहे. याआधी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी-खुर्द येथे जादूटोण्याच्या संशयावरून सात लोकांना मारहाण करण्यात आली होती.

    दरम्यान, अशोक कामठे हा जादूटोणा करतो आणि त्यामुळे मयुरी (25) हिची प्रकृती सतत बिघडते. असा आरोप करत प्रमोद सडमाके (35), सीताराम सडमाके (66), मयुरी, पिल्ला आत्राम (20) आणि चंद्रकला आत्राम (55) यांनी यशोदा आणि इंदिराबाई यांना लाथा-बुक्क्यांनी तर अशोक याला बांबू आणि बॅटने मारहाण केली, अशी तक्रार पोलिसांत नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी नागभीड पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.