विद्यार्थ्यांसह सेवाभावी शिक्षकांचा सत्कार; शासकीय सेवेसाठी निवड

राजुरा तालुक्यातील विहीरगांव ग्रामपंचायत व गावातील युवकांच्या वतीने स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी झालेल्या आणि शासकीय सेवेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि सेवाभावी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

    राजुरा (Rajura).  तालुक्यातील विहीरगांव ग्रामपंचायत व गावातील युवकांच्या वतीने स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी झालेल्या आणि शासकीय सेवेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि सेवाभावी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित सरपंच राम देवईकर होते.

    सीमा सुरक्षा बलामध्ये गावातील दीपक खेडेकर यांची निवड झाली आहे. देशसेवेसाठी रुजू होणाऱ्या या गावातील युवकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गावांतील सार्वजनिक वाचनालयाला सहकार्य केलेले येथील शिक्षकद्वय वानखेडे व दिपक खेडेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शिक्षकांनी गावात शैक्षणिक वातावरण निर्माण केल्याने व उत्तम मार्गदर्शन मिळाल्याने गावातील युवक प्रगती करीत आहेत. वाचनालयाला भेट वस्तू देऊन विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण करण्याची व येथील लोकांप्रती आपुलकीची भावना बाळगल्याबद्दल सरपंच राम देवईकर यांनी समाधान व्यक्त केले.

    यावेळी बोलताना शिक्षक वानखेडे यांनी चांगले विचार व व्यक्तिमत्त्व हीच आयुष्याची खरी शिदोरी असल्याचे मत मांडून अशा कार्यक्रमातून गावातील युवकांना प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्तविक गणेश चंदनखेडे, संचालन मनिषा धवणे व आभार प्रदर्शन योगेश कोडापे यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थी निखिल सुपारे, अक्षय बोळे, राजकुमार वांढरे, आशिष बोबडे, श्वेता येरेवार, मयुर वांढरे, कल्याणी वांढरे, निकिता साळवे, पायल येरेवार,पायल बोधे, ममता काळे उपस्थित होते.