In Chandrapur Nagar Panchayat, Congress is leading with 42 seats

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला जरा जास्तच महत्त्व आहे. यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

    ओबीसी आऱक्षणाशिवाय पार पडलेल्या १०६ नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची आज मतमोजणी सुरु आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय पहिल्यांदाच नगरपंचायत आणि दोन जिल्हा परिषदेत निवडणुका पार पडल्या आहेत. याचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्यातील १०६ नगरपंचायत तसेच, भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय.  या निकालाच्या पार्श्वभूमीवर जनतेचा नेमका कौल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी  ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे,  सर्वांनास  या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे.

    चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता, चंद्र्पुर मध्ये एकूण ६ नगरपंचायतीमध्ये एकूण १०२ जागांसाठी लढत होती. त्यापैकी ४२ जागांवर काँग्रेसने  आघाडी मिळविली आहे. तसेच, दुसऱ्या क्रमांकावर २३ जागांसह भाजप शर्तीची लढत देत आहे. तसेच , यात  शिवसेना ०५ जागांवर आपला गड राखून आहे. तर, राष्ट्रवादीने ०४  जागांसह आपले खाते उघडले आहे. इतर अपक्षांना- ०४ जागांसह समाधान मानावे लागले आहे. तर, चंद्रपुरातील जिवती येथे एकूण  जागा १७ असून येथे राष्ट्रवादीने  ०६ तर, काँग्रेसने o६ जागा मिळविल्या आहेत. येथे अपक्षाने ०५ जागांवर विजय प्राप्त केला आहे. तर , भाजप आणि शिवसेना अजूनही खात उघडण्यास अयशस्वी ठरले  आहे.