चंद्रपूरात खाकीवर डाग, पोलीसानेच केला महिलेवर बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपायाने ब्रह्मपुरी येथील टिळक नगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना आज दिनांक 19 जानेवारी रोजी उघडकीस आली.  लालश्याम बाबुराव मेश्राम वय (51) असं अत्याचार करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे. सध्या आरोपी पाथरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे.

    चंद्रपुर : ब्रम्हपुरी पाथरी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस शिपायाने ब्रह्मपुरी येथील टिळक नगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना आज दिनांक 19 जानेवारी रोजी उघडकीस आली असून लालश्याम बाबुराव मेश्राम वय (५१) असे अत्याचार करणाऱ्या पोलिस शिपायाचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपायाने ब्रह्मपुरी येथील टिळक नगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना आज दिनांक 19 जानेवारी रोजी उघडकीस आली.  लालश्याम बाबुराव मेश्राम वय (51) असं अत्याचार करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे. सध्या आरोपी पाथरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे.

    पीडित महिला ही ब्रह्मपुरी येथील टिळक नगरात राहते. ही महिला पतीपासून विभक्त असल्यामुळे एकटी राहत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर आरोपी लालश्याम मेश्राम याने या महिलेशी संपर्क साधला. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने या महिलेला आक्षेपार्ह फोटोज आणि मेसेज पाठविले.  या महिलेनं अखेर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

    सध्या आरोपी पाथरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याचे विश्‍वसनीय माहिती आहे फिर्यादी अत्याचारग्रस्त महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लालश्याम बाबुराव मेश्राम याला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली. फिर्यादी विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लालश्याम मेश्राम यांच्या विरोधात कलम अप क्र.३०/२०२२ भारतीय दंड संहिताचे कलम ३७६(२)(n) ३४५(d)(१) ५००, ५०६ भादवी सह कलम ६७(अ) माहीती व तंत्रज्ञान अधिनीयम २००० चे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.