no mask no ride in chandrapur

चंद्रपूर. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी तथा कोरोनाशी लढा देण्यासाठी वाहतूक शाखेच्यावतीने ‘नो मास्क,नो सवारी’,’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. याबाबत चंद्रपूर शहरातील ऑटो संघटनेची एक बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आटोच्या मागे सूचनादर्शक बॅनर लावून शुभारंभ करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खेरे यांचे मार्गदर्शनात ही मोहीम सुरू केली. शात ककत दोन दिवस बॅनर लावण्याची मोहीम येणार आहे. ऑटो चालकांनी स्वतः मास्क घालावे व ऑटोत बसणाऱ्या प्रवाशांना मास्क अनिवार्य करावे असे आवाहन केले आहे. सद्यस्थितीत चंद्रपुरात सुरू करण्यात आलेली ही मोहीम नंतर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. असे वाहतूक शाखेचे पो. नि. ह्दयनारायण यादव यांनी कळविले आहे.