ताडोबामध्ये धक्कादायक घटना! वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

ताडोबा प्रकल्पात सध्या व्याघ्र गणनेची कामे सुरू आहेत. त्याच अंतर्गत शनिवारी सकाळी कोलारा गेट येथे कोअर झोन ९७ मध्ये ट्राझेक्ट लाइन टाकण्याचे काम सुरू होते. वनरक्षक स्वाती ढुमने या देखील कामाच्या पूर्वतयारीसाठी तिथं गेल्या होत्या. त्याचवेळी माया नावाच्या वाघिणीने त्यांच्यावर .......

    चंद्रपूर (Chandrapur) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (Tadoba-Andhari tiger reserve) कोलारा वनपरिक्षेत्रात (the Kolara forest reserve) एका वाघिणीने (tiger reserve) केलेल्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा (A female forest ranger) मृत्यू (kill) झाला आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घटना घडली असल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.

    स्वाती ढुमने (वय ४३) असे त्या महिला वनरक्षकचे नाव आहे. ताडोबा प्रकल्पात सध्या व्याघ्र गणनेची कामे सुरू आहेत. त्याच अंतर्गत शनिवारी सकाळी कोलारा गेट येथे कोअर झोन ९७ मध्ये ट्राझेक्ट लाइन टाकण्याचे काम सुरू होते. वनरक्षक स्वाती ढुमने या देखील कामाच्या पूर्वतयारीसाठी तिथं गेल्या होत्या. त्याचवेळी माया नावाच्या वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला. सोबत असलेल्या चार वनमजुरांनी वाघाला हुसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघाने स्वाती यांना ओढून दाट जंगलात नेले.

    या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ताडोबा व्यवस्थापनाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने रवाना झाले व शोधमोहीम राबवली गेली. अखेर शोधमोहिमेत मृतदेह सापडला.