sindewahi latest news

  • कृषी विधेयक राज्यात लागू करा! या मागणीचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

सिंदेवाही. सदैव शेतकर्‍यांच्या, सामान्यांच्या हितासाठी कटिबद्ध असलेल्या केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या सुकल्याणासाठी मागील महिन्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक-२०२० बहुमताने पारित केले. हा कृषिकायदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून यामुळे शेतकऱ्यांची दलालांकडून होणारी पिळवणूक थांबणार आहे. याने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकटी सुद्धा मिळणार आहे. या विधेयकाने शेतकऱ्यांसाठी एक देश- एक बाजारपेठ अशी संकल्पना उदयास येणार आहे. परंतु शेतकऱ्यांप्रती नेहमी तोकडी भुमिका घेणार्‍या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सदरहू विधेयक महाराष्ट्रात लागू न करण्याचा निर्णय घेतल्याने हा निर्णय रद्द करावा व राज्यात कृषी विधेयकाची अंमलबजावणी करण्यात यावी. याकरिता दि. ७ ऑक्ट २०२० ला भारतीय जनता पार्टी सिंदेवाही तालुका यांचेवतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
यासोबतचं मा. तहसीलदार सिंदेवाही यांना तालुका भाजपच्या शिष्टमंडळातर्फे यावेळी निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी, जि. प. समाजकल्याण सभापती तथा तालुका महामंत्री नागराज गेडाम, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पा. बोरकर, जेष्ठ नेते प्रा. गणविर सर, कमलाकरजी सिद्धमशेट्टीवार, गटनेते तथा पं. स. सदस्य रितेश अलमस्त, माजी नगराध्यक्षा सौ. मोहीनीताई गेडाम, माजी उपनगराध्यक्ष हितेशभाऊ सुचक, नगरसेवक दिवाकर पुस्तोडे, राजु करकाडे, रोशन मुद्दमवार, नगरसेविका सौ. अंजली बल्लेवार, सौ. शालीनी बोरकर, सौ. छाया हाडगे यांसह आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.