प्रतिकात्मक फोटो (Symbolic Photo)
प्रतिकात्मक फोटो (Symbolic Photo)

व्यायामशाळेला सावरकरांचे नाव देण्याची गरज नाही, असे म्हणत इंटक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांनी आक्षेप घेतला. कार्यकर्त्यांसह गोंधळ घालण्यास सुरुवात केली. भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आल्याने धक्काबुक्की झाली.

    चंद्रपूर (Chandrapur) :  शिवनेरी मैदानावर खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव दिल्यावरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. हा वाद वाढून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. बुधवारी दुपारच्या सुमारास ही खळबळजन घटना घडली.

    मनपातील तुकूम प्रभाग क्रमांक एकमध्ये २०१८-१९ मध्ये हंसराज अहिर यांच्या खासदार निधीतून मंजूर शिवनेरी मैदानावरील वीर वि. दा. सावरकर व्यायामशाळेचे लोकार्पण झाले. २६ लाख रुपये खर्चून ही व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. मैदानाला शिवनेरी हे नाव असताना व्यायामशाळेला सावरकरांचे नाव देण्याची गरज नाही, असे म्हणत इंटक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांनी आक्षेप घेतला.

    कार्यकर्त्यांसह गोंधळ घालण्यास सुरुवात केली. भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आल्याने धक्काबुक्की झाली. मैदानातील व्यायामशाळेचे नाव सावरकर असले तरी मैदानाचे नाव शिवनेरीच कायम राहील, असे स्पष्ट केले आहे.