ताडोबात पहिल्यांदाच आढळला तणमोर पक्षी (Lesser Florican); मादी तणमोर पक्षाच्या नोंदीने पक्षी वैभवात मोठी भर

या तणमोर पक्ष्याचा पूर्ण वाढीचा पक्षी 510 ते 740 ग्राम एवढ्या वजनाचा असतो. नर 45 सेंटिमीटर लांबीचा तर मादी 50 सेंटिमीटर एवढी असते. बस्टर्ड परिवारातील एकूण ६ प्रजाती भारतीय उपखंडात आढळतात. त्यातील तणमोर- माळढोक प्रमुख आहेत.

  चंद्रपूर (Chandrapur). ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या (the Tadoba-Dark Tiger Project) वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये (a camera trap) दुर्मिळ तणमोर पक्षाची मादी (rare female peacock) आढळून आल्याने पक्षीप्रेमी (Birdwatchers) मध्ये आनंद व्यक्त (overjoyed) केला जात आहे. ही नोंद याच वर्षातील मे महिन्यात झाली आहे. याआधी नांदेड- नाशिक- सोलापूर- अकोला- चंद्रपूर या जिल्ह्यात (Nanded-Nashik-Solapur-Akola-Chandrapur district.) तणमोर पक्षी आढळून आला होता.

  तणमोर पक्षी बस्टर्ड परिवारातील सर्वांत छोटा पक्षी आहे. तर “genus sypheotides” परिवारातील एकमेव सदस्य आहे. त्याला तणमोर अथवा लिख/ खरमोरे असेही म्हणतात. हा संपूर्ण भारतीय उपखंडात अभावानेच आढळतो. यातील नर पक्षी प्रजनन काळातील नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. याचमुळे त्याची शिकार देखील केली जाते.

  पक्षी वैभव संवर्धनाच्या अभियानासाठी भारत सरकारने 2006 या वर्षात तणमोर पक्षावर एक आकर्षक टपाल तिकीट जारी केले होते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कॅमेरा ट्रॅप नोंदींचे विश्लेषण करत असताना पथकातील सदस्यांना बस्टर्ड परिवारातील या आकर्षक पक्ष्याचे फोटो मिळाले.

  या तणमोर पक्ष्याचा पूर्ण वाढीचा पक्षी 510 ते 740 ग्राम एवढ्या वजनाचा असतो. नर 45 सेंटिमीटर लांबीचा तर मादी 50 सेंटिमीटर एवढी असते. बस्टर्ड परिवारातील एकूण ६ प्रजाती भारतीय उपखंडात आढळतात. त्यातील तणमोर- माळढोक प्रमुख आहेत.

  बेंगाल फ्लोरिकन आणि तिच्या प्रजाती भारत- नेपाळ- कांबोडिया आदी देशात आढळतात. तर आणि ग्रेट बस्टर्ड आणि हुबारा आदी पाहुणे पक्षी म्हणून भारतात येतात. तणमोर पक्षाचा प्राथमिक निवास गवताळ प्रदेशात असतो. महाराष्ट्रात या पक्षाचे आधीची नोंद 2013 या वर्षी याच जिल्ह्यातील वरोरा येथे झाली आहे.

  तणमोर पक्षी साधारणपणे रबी पिकांच्या काळात आणि आसपास आढळून येत असल्याचे समजते. त्यामुळेच पारंपरिक पीकपद्धती या पक्षाला अधिवास प्रदान करते. तणमोर पक्षी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान नव्या पिढीला जन्म घालतो. याच पाऊसकाळात गवताळ प्रदेशात गवत वाढलेले असते. त्याचे भक्ष्य याच गवताळ प्रदेशातील कीटक आहेत.