
चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या पट्टेदार वाघाला वाचविण्यात वनविभागाला यश आलं आहे. वनविभागाने दोरीच्या मदतीने विहिरीत खाट टाकली आणि खाटेचा आधार घेत बाहेर निघून वाघाने विहिरी बाहेर उडी मारली. बाहेर येताच वाघाने जंगलात धूम ठोकली. वरोरा तालुक्यातील मोखाळा-अल्फार मार्गावरील गमन शिरपाते यांच्या शेतातील विहिरीत पडला होता.
चंद्रपूर जिल्ह्यात विहिरीत पट्टेदार वाघ पडल्याची घटना उजेडात आली होती. वरोरा तालुक्यातील मोखाळा येथील शेतशिवारात ही घटना उघडकीस आली. गमन सरपाते यांच्या शेतातील विहिरीत हा पट्टेदार वाघ आढळला. शिकारीचा पाठलाग करतांना वाघ विहिरीत पडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. उंच कठडा नसलेल्या विहिरीच्या पाळी वर असलेला एक दोर देखील वाघाभोवती गुंडाळल्याचे चित्र सकाळी नजरेस पडले.