
या प्रकरणाचा तपास करून भद्रावती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणी भद्रावती न्यायालयाने मंगळवारी आरोपींना दोषी ठरवत तिन्ही आरोपींना एक वर्षाची सक्तमजुरी सह रु.२००० दंडाची शिक्षा सुनावली.
भद्रावती : सन २०१२ मध्ये माजरी पोलीस ठाण्यांतर्गत तीन आरोपींनी रस्त्याने जाणाऱ्या महिलेचा सार्वजनिक ठिकाणी विनयभंग करून तिला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेबाबत फिर्यादीने माजरी पोलिसात तक्रार दिली होती. माजरी पोलिसांनी नंदकिशोर मांढरे, दशरथ मांढरे, लक्ष्मण पचारे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती.
या प्रकरणाचा तपास करून भद्रावती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणी भद्रावती न्यायालयाने मंगळवारी आरोपींना दोषी ठरवत तिन्ही आरोपींना एक वर्षाची सक्तमजुरी सह रु.२००० दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी वकील खंडाळकर यांनी युक्तिवाद केला. तपासी अधिकारी पीएसआय बाबुराव कुसले, न्यायालयातर्फे हवालदार राजकुमार उरकुडे यांनी बाजू मांडली.