शेतकरी हरीश घोर यांच्या शेतातील सोयाबीनला अज्ञात लोकांनी आग लावल्यानंतर सोयाबीनची राखरांगोळी झाली.
शेतकरी हरीश घोर यांच्या शेतातील सोयाबीनला अज्ञात लोकांनी आग लावल्यानंतर सोयाबीनची राखरांगोळी झाली.

  • शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे सोयाबीन जळून राख

चंद्रपूर (Chandrapur).  जिल्ह्यातील गडचांदूर शहराअंतर्गत येणाऱ्या कोरपन्ना तहसील येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी हरीश घोर यांचे विसापूर शेतात सोयाबीन पिकाला ४ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात लोकांनी आग लावली. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे सोयाबीन जाळून राख झाले आहे.

शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने तो मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकरी घोर यांनी सोयाबीनचे पीक कापून ढीग लावले होते; पण रविवारी रात्री कुणीतरी सोयाबीनचे ढीग पेटवून दिले. ज्यामुळे सोयाबीन जळून खाक झाली. यात लाखो रुपये किंमतीच्या शेतकर्‍याचे ४५ क्विंटल पिकाचे नुकसान झाले आहे. हरीश घोर यांच्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घोरे यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.