अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची विजय वडेट्टीवारांनी केली पाहणी

    चंद्रपूर (Chandrapur) : गेल्या आठवड्यात सावली तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे हातात आलेले पीक गेले आहे अशी परिस्थिती आहे.

    आज राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याभागात पाहणी केली.सावली तालुक्यात मुंडाळा, पाथरी, उसरपार, मंगरमेंढा इथल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.शेतकऱ्यांनो खचू नका, असा धीर देत मदतीचं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिलं.