
रात्रीच्या सुमारास अपघाताची शक्यता बळावली आहे. रेतीघाट लिलावात स्थानिक नागरिकांना डावलून रेती तस्करी करणा-या आडदांड, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून नागरिकांना त्याच्या वाहतुकीमुळे नाहक त्रास होत आहे.
ब्रम्हपुरी: अ-हेर -नवरगाव येथील रेती घाटावर अवैध रेती वाहतूक राजरोसपणे सुरू असून रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या अवैध रेती उपसा व रेती वाहतुकीमुळे गावातील नागरिक त्रस्त असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असून सक्षम अधिका-यांकडून मात्र डोळझाक होत आहे.
रात्रीच्या सुमारास होणा-या अवैध वाहतुकीमुळे गावातील नागरिकांना गाड्यांचा कर्कश आवाजामुळे त्रास होत असुन त्यांची झोप मोड होत आहे. रात्रीच्या सुमारास अपघाताची शक्यता बळावली आहे. रेतीघाट लिलावात स्थानिक नागरिकांना डावलून रेती तस्करी करणा-या आडदांड, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून नागरिकांना त्याच्या वाहतुकीमुळे नाहक त्रास होत आहे.
तरी सक्षम अधिका-याने जातीने लक्ष घालून अवैध रेती वाहतुकीला आळा घालावा अन्यथा गावातील नागरिक तथा जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरुन नेहमीसाठीच रेती वाहतुक बंद पाडतील, असा इशारा दिला आहे. यावेळी जनशक्ती पक्षातर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात ॲड. हेमंत उरकुडे, डॉ. हरिश्चंद्र ठेंगरे, लतेश रामटेके, राहुल पांडव, प्रशांत दाणी, रामपाल तुपट, राजेश ठेंगरे, तुषार ठेंगरे, डाकराम ठेंगरे, होमराज राऊत, ॲड. सुधीर तलमले, ॲड. मंगेश मिसार, ॲड.संतोष रामटेके आदीचा समावेश होता.