10 hours clash in Gadchiroli's forest: Maharashtra Police's big action! Naxal commander Milind Teltumbde and 26 others killed, 4 injured n

५० लाखांचे इनाम असलेला नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवाद्यांचा खात्मा(Naxal commander Milind Teltumbde and 26 others killed) केल्याचा दावा महाराष्ट्र पोलिसांनी(Maharashtra Police's big action) केला आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्यारापट्टीच्या जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटसोबत झालेल्या चकमकीत तेलतुंबडेसह २६ नलक्षलवादी मारले गेले आहेत. त्यांच्याकडून मोठ्य़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे, बॉम्ब आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे(10 hours clash in Gadchiroli's forest).

  गडचिरोली : ५० लाखांचे इनाम असलेला नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवाद्यांचा खात्मा(Naxal commander Milind Teltumbde and 26 others killed) केल्याचा दावा महाराष्ट्र पोलिसांनी(Maharashtra Police’s big action) केला आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्यारापट्टीच्या जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटसोबत झालेल्या चकमकीत तेलतुंबडेसह २६ नलक्षलवादी मारले गेले आहेत. त्यांच्याकडून मोठ्य़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे, बॉम्ब आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे(10 hours clash in Gadchiroli’s forest).

  या चकमकीत चार जवान जखमी झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. रवींद्र नेताम, सर्वेश्वर अत्राम, महरु कुदमेठे आणि टीकाराम कटांगे अशी या चार जखमी पोलिसांची नावे आहेत. त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

  मृत नक्षलींचा आकडा वाढण्याची शक्यता

  पोलीस मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आत्तापर्यंत २६ मृतदेह हाती आले आहेत. मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घनदाट जंगल असल्याने आणि रात्र झाल्यामुळे सर्च ऑपरेशन तूर्तास थांबवण्यात आले आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

  ५० लाखांचे इनाम असलेला मिलिंद तेलतुंबडेही ठार

  या चकमकीत ५० लाखांचे इनाम असणार नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे हाही मारला गेल्याची माहिती आहे. शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांकडून मृतदेहांची ओळख पटवण्यात येणार आहे. मिलिंद तेलतुंबडे याच्यावर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणीही आरोपपत्रात आरोपी होता.

  गनिमी काव्याचे प्रशिक्षण देत असे मिलिंद

  मिलिंद तेलतुंबडे हा आनंद तेलतुंबडेचा भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिलिंद आपल्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी आनंदच्या साहित्याचा वापर करती असे. मिलिंद नक्षलवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत होता आणि नव्याने भरती होणाऱ्यांना गनिमी काव्याने युद्धाचे प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरांचे आयोजनही करीत असे. मिलिंदला दीपा, प्रवीण, अरुण आणि सुधीरीच्या नावानेही ओळखले जात असे. मिलिंदची पत्नी एंजेला सोंताकेलाही २०११ साली अटक करण्यात आली होती. तिच्याविरोधातही अनेक गुन्ह्यांची नोंद होती.

  गडचिरोलीच्या इतिहासात दुसरी सर्वात मोठी चकमक

  पोलीस अधीक्षक गोयल यांनी सांगितले की गडचिरोलीच्या इतिहासात नक्षलवाद्यांशी चाललेली ही सर्वात मोठी दुसरी चकमक होती. सकाळी सहा वाजता सुरु झालेली ही चकमक संध्याकाळी चारच्या सुमारास संपली. यापूर्वी २३ एप्रिल २०१८ रोजी गडचिरोली पोलिसांनी दोन वेगवेगळ्या चकमकीत ४० नक्षलवाद्यांना ठार केले होते. एटापल्लीच्या बोरिया कास्मानूर परिसरात ३४ जण मारले गेले होते, तर इतर सहा जणांना अहेरीत फरार झाल्यानंतर, मारण्यात आले होते.