६०० किलो सुगंधित तंबाखू जप्त; गोठणगाव नाक्याजवळ केली कारवाई

कुरखेडा पोलिसांनी (Kurkheda police) गोठणगाव फाट्यावर (Gothangaon fork) नाकाबंदी (cordoned off) लावत एका चारचाकी वाहनातून अवैधपणे वाहतूक होत असलेला ६०० किलो सुगंधित तंबाखू जप्त करून दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारच्या रात्री करण्यात आली.

    गडचिरोली (Gadchiroli). कुरखेडा पोलिसांनी (Kurkheda police) गोठणगाव फाट्यावर (Gothangaon fork) नाकाबंदी (cordoned off) लावत एका चारचाकी वाहनातून अवैधपणे वाहतूक होत असलेला ६०० किलो सुगंधित तंबाखू जप्त करून दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारच्या रात्री करण्यात आली. देवरीमार्गे कुरखेडाकडे येणारे वाहन (एमएच ३५ एजे २०३७) संशयास्पद स्थितीत (suspicious condition) दिसून आल्याने गोठणगाव नाक्यावर ते थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनात ५० लहान पोत्यांमध्ये ६०० किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला.

    माल व वाहन असा एकूण ६ लाख ६० हजारांचा ऐवज जप्त करून आरोपी वाहन चालक शैलेज राजपांडे रा.देवरी आणि त्याचा सहकारी अब्दुल यासीनखा पठाण रा.सोनुटोला, ता. गोरेगाव, जि.गोंदिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, उपनिरीक्षक नारायण शिंदे, हवालदार बाबूराव उराडे, मनोहर पुराम तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांनी केली.