विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

    वरोरा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ नेते व माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या नेतृत्वात शहरातील विविध संघटनेतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला.

    यावेळी तालुकाध्यक्ष विशाल पारखी, शहराध्यक्ष प्रदीप बुराण, पदवीधर मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष पोपळे, युवा नेते जयंत टेमुर्डे, शहराध्यक्ष अतुल वानखेडे, तालुकाध्यक्ष, विजेंद्र नन्नावरे तसेच अविनाश ढेगंळे, बंडु भोंगाळे, अरुण सहारे यांच्या उपस्थितीत राहुल दारुंडे यांच्या सह तेजस पाटील, रुपेश देवकर, मिथुन दारुंडे, शुभम चवारकर, आशिष किन्नाके, रणधीर दारुंडे, गौरव सोनवाने, प्रथम वाळके हिमांशु शंभरकर, संजय चौरसिया, गोलु भसारकर, महेश शेनवारे, रोहित हिवरकर, चेतन देवकर, बादल मेश्राम, पवन पेंदोर, विक्की शेंडे, प्रशांत किन्नाके, विशाल सिडाम, विशाल पाटील, गोलू रामटेके, संघरत्न कांबळे, गणेश चावला, मोहन रायपुरे, आकाश वाघमारे, इत्यादी कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यासर्व नवप्रवेशित कार्यकर्त्यांचा पक्षाचा दुपट्टा व पुप्प देवून पक्षात स्वागत करण्यात आले.