ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकची दुचाकीला चिरडले; एकाचा जागीच मृत्यू

    गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली शहरात पोलीस स्टेशनसमोर एका ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना काल सायंकाळी ७. ३० च्या सुमारास घडली. दुर्गेश नंदनवार वय ३५ असे मृतकाचे नाव असून ते सुंदरम फायनान्समध्ये नोकरीला होते. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    चंद्रपूर मार्गावर रोडला लागून दुकाने असल्यामुळे पोलीस स्टेशनसमोर नेहमी गर्दी दिसून येते आणि सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे नेहमी पेक्षा जास्त गर्दी आहे. त्यातला त्यात वाहनांकरिता पार्किंग उपलब्ध नसल्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने उभे करून खरेदी करीत असतात.

    काल दुर्गेश नंदनवार हे होंडा ऍक्टिवा क्र.एम एच ३३ बी वाय ६६१५ ने चंद्रपूर रस्त्याच्या मार्गाने इंदीरा गांधी चौकाकडे जात असताना पोलीस स्टेशन समोर एम एच १२ व्ही ०३४ ९ ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्या दुकानासमोरील गर्दीमुळे ट्रकच्या चाकाखाली आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

    अगदी पोलीस स्टेशन समोर अपघात घडल्याने अपघातानंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. सदर घटनेची नोंद गडचिरोली पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.