adivasi vikas parishad

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विविध पदावर कार्यरत असलेल्या विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. मनीराम मडावी आणि महिला अध्यक्षा पुष्पा आत्राम यांच्याहस्ते नियुक्तीपत्र सुद्धा प्रदान करण्यात आले. आदिवासी समाजाच्या समस्यावर मंथन करण्यात आल्यानंतर सामाजिक  समस्यांवर आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

    गडचिरोली : नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ प्रदेश कार्यकारिणीच्या सभेत आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी,  महिला शाखा अध्यक्षा पुष्पा आत्राम यांनी राजस्थान येथील जयपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनातील चर्चेचा आढावा सादर केला. या सभेत विदर्भ प्रदेश संघटना मजबुत करणे, आजीवन सभासद वाढविण्यास प्रयत्नरत असणे तसेच सामाजिक प्रश्न व समस्यांबद्दल त्वरित दखल घेणे अशा विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.  

     तसेच, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विविध पदावर कार्यरत असलेल्या विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. मनीराम मडावी आणि महिला अध्यक्षा पुष्पा आत्राम यांच्याहस्ते नियुक्तीपत्र सुद्धा प्रदान करण्यात आले. आदिवासी समाजाच्या समस्यावर मंथन करण्यात आल्यानंतर सामाजिक  समस्यांवर आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

    यावेळी, राम प्रदेश उपाध्यक्ष आदिवासी सेवक घनश्याम मडावी, महासचिव जयप्रकाश उईके, महासचिव सचिन पालकर, वर्धा जिल्हाध्यक्ष शरद आडे, जगदीश आत्राम, किशोर गेडाम, वासुदेव म्हरस्कोल्हे, बंडोपंत उईके, श्याम मसराम, विनायक शेडमाके, गजानन आत्राम, पांडुरंग कुमरे, अर्चना सिडाम, नरेंद्र चिमुरकर, नरेश वाडवे, पी. टी. आत्राम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक व संचालन संघटनेचे सचिव सुभाष मसराम यांनी केले. सभेला सर्व कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.