Chandrapur in Vidarbha was the hottest district, while Gadchiroli recorded the lowest

चंद्रपुरातील तापमान चक्क ४३ अंश सेल्सियस नोंदविण्यात आल्याने चंद्रपुरकरांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. मार्च महिन्याची ही परिस्थिती तर पुढचा उन्हाळा कसा जाईल, असा प्रश्न चंद्रपूरकरांना पडला आहे.

    चंद्रपूर : सर्वत्र सध्या अचानक वाढलेल्या उष्णतेच्या तडाख्याने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. सद्या गुजरात व राजस्थान मध्ये उष्णतेची लाट पसरली असून त्याची झळ विदर्भाला सोसावी लागत आहे. तेथील उष्ण वारे विदर्भात आल्याने गुरुवार ( १७ मार्च ) ला राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुर जिल्ह्याची करण्यात आली. चंद्रपुरातील तापमान चक्क ४३ अंश सेल्सियस नोंदविण्यात आल्याने चंद्रपुरकरांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. मार्च महिन्याची ही परिस्थिती तर पुढचा उन्हाळा कसा जाईल, असा प्रश्न चंद्रपूरकरांना पडला आहे.
    मागील वर्षी १७ मार्चला हेच तापमान ४० अंश सेल्सियस होते. तर, ३० मार्च २०२१ ला सर्वाधिक तापमानाची नोंद ४३.६ अंश सेल्सियस करण्यात आली होती. यंदा ४० अंश सेल्सियस चा पारा सुरवातीलाच चंद्रपूरने गाठल्याने चंद्रपुरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूरला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. गडचिरोलीचे तापमान ३८.२ अंश सेल्सियस होते.