१ कोटीचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याचा हृदयविकाराने मृत्यू; तेलंगणा पोलिसांची माहिती

गडचिरोली (Gadchiroli). तेलंगणसह दंडकारण्यात सक्रिय असलेला जहाल माओवादी (Maoist) हरीभूषण (वय ५०) (Haribhushan) याचा सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने (a heart attack) मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूवर माओवादी चळवळीतून प्रतिक्रिया आली नसली तरी पोलिसांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

  गडचिरोली (Gadchiroli). तेलंगणसह दंडकारण्यात सक्रिय असलेला जहाल माओवादी (Maoist) हरीभूषण (वय ५०) (Haribhushan) याचा सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने (a heart attack) मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूवर माओवादी चळवळीतून प्रतिक्रिया आली नसली तरी पोलिसांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हरिभूषण (Haribhushan) याच्या शिरावर एकूण एक कोटी रूपयांचे बक्षिस होते. मागील काही काळात अनेक माओवाद्यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती, तेलंगण पोलिसांनी दिली.

  छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या हरीभूषणला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्याच्यावर तेलंगण आणि छत्तीसगड सीमेवरील जंगलात उपचार सुरू होते. त्यातच हृदयविकाराच्या धक्क्याने हरीभूषणचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी मंगळवारी तेलंगणमध्ये पसरली. तेलंगणमधील कोत्तागुडमचे पोलिस अधीक्षक सुनील दत्त यांनी सूत्राकडून पोलिसांना मिळालेली माहिती खरी असल्याचे एका वृत्तपत्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

  जहाल माओवादी हिडमासह काही माओवादी करोनाबाधित असल्याची माहितीही दत्त यांनी यावेळी दिली. करोनाच्या उपचारासाठी तेलंगणमध्ये आलेल्या शोभा राय या माओवाद्याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत करोनाबाधित माओवाद्यांची नावे पोलिसाना मिळाली होती. शोभा राय याचा काही दिवसांपूर्वी करोनामुळे मृत्यू झाला आहे. हरीभुषण याच्या मृत्यूमुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

  गडचिरोलीत होता सक्रिय
  हरीभूषणचे मूळ नाव यापा नारायणा असून तेलंगणच्या महबुबाबाद जिल्ह्यातील माडेगुडम येथील तो रहिवासी होता. ‘पीपल्स वॉर ग्रुप’ या संघटनेतून १९९५मध्ये माओवादी चळवळीत सक्रिय झाला. हरीभूषणवर सध्या माओवादी संघटनेच्या तेलंगण राज्य समितीच्या सचिवपदाची जबाबदारी होती. संघटनात्मक बांधणीसह हिंसक घटनांची आखणी करण्यातही त्याचा हातखंडा होता.

  तेलंगणसह महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातही तो सक्रिय होता. या काळात हरीभूषणने काही माओवाद्यांना महाराष्ट्र-तेलंगणच्या सीमावर्ती जंगलात विशेष प्रशिक्षण दिले होते. दंडकारण्यात माओवादी संघटना मजबूत करण्याची अतिरिक्त जबाबदारी हरभूषणवर देण्यात आली होती.