Trembling in the forest of Gadchiroli! Police encounter kills 26 militants, including Milind Teltumbde, the country's largest commander; The Naxalite movement is in full swing

दर्भात गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत देशातील सर्वात मोठा कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह 26 नलक्षवादी ठार झाले आहे (Gadchiroli police encounter kills 26 militants, including country's top commander Milind Teltumbde).  ग्यारापट्टीच्या जंगलात पोलिसांच्या सी-६० तुकडीसोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली.

  गडचिरोली : विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत देशातील सर्वात मोठा कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह 26 नलक्षवादी ठार झाले आहे (Gadchiroli police encounter kills 26 militants, including country’s top commander Milind Teltumbde).  ग्यारापट्टीच्या जंगलात पोलिसांच्या सी-६० तुकडीसोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली.

  गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या कारवाईची माहिती दिली आहे. या चकमकीत तीन पोलीस जवानही जखमी झाले आहेत. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.

  चकमकीत ठार झालेला मिलिंद तेलतुंबडे आहे तरी कोण?

  मिलिंद तेलतुबंडे हा लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा लहान भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हा मुळचा वणी येथील असून मागील  अनेक वर्षांपासून तो नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय आहे. तेलतुंबडे हा भाकप माओवादी या पक्षाचा महाराष्ट्राचा सचिव देखील होता. त्याच्यावर 50 लाखांचे बक्षिस होते. तो नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा नेता होता.

  एलगर परिषद प्रकरणात त्याला फरार आरोपी म्हणून घोषीत करण्यात आले आहे. एल्गारमधील कारावासात असलेला दुसरा आरोपी डॉक्टर आनंद तेलतुंबडेचा तो भाऊ आहे. पश्चिम भारतात प्रामुख्याने महाराष्ट्राची जबाबदारी त्याच्यावर होती. जंगल आणि शहरी या दोन्ही क्षेत्रात तो सक्रिय होता. एमएमसी म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश तिन्ही राज्यांचा एमएमसी असा गुरीलला झोन त्याने विकसित केला होता.

  तेलतुंबडेची पत्नी एंजेला सोनटक्के ही देखील माववादी म्हणून पकडली गेली होती. शहरी भागात माववादी संघटनांमध्ये दलित समाजातील तरुणांना भरती करण्यावर त्याचे विशेष लक्ष होते.  शस्त्र ट्रेनिंग देणे, ऑपरेशनला मान्यता देणे आदी जबाबदाऱ्या त्याच्यावर होत्या.