गडचिरोलीमध्ये १४३८ विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससी परीक्षा

विविध कारणे सांगून लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा पुढे ढकलली जात होती. आठ दिवसांपूर्वी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.

    गडचिरोली. गडचिरोली शहरातील आठ परीक्षा केंद्रावर रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 2 हजार 270 जणांनी अर्ज केले होते. प्रत्यक्षात 1 हजार 438 विद्यार्थी परीक्षेला बसले तर 832 विद्यार्थी अनुपस्थित होते.

    विविध कारणे सांगून लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा पुढे ढकलली जात होती. आठ दिवसांपूर्वी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर परीक्षा 21 मार्च रोजी घेण्याची घोषणा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर गर्दी होणार नाही, याची दक्षता प्रशासनामार्फत घेण्यात आली होती. दोन बेंचेसमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते. तसेच परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर, मास्कही ठेवले होते.