गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागच व्हेंटिलेटरवर

    गडचिरोली. आदिवासीबहूल नागरिकांचे आरोग्याची धुरा ज्या आरोग्य विभागावर आहे. ते आरोग्य विभागच व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र बघावयास मिळते. सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या झिंगानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या झोपडीवजा घरातून हे वास्तव खऱ्या अर्थाने चित्रित होते.