Naxals attack in Gadchiroli: पोलिसांना देणार रोख बक्षीस; पालकमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

सी-60 जवानांनी गडचिरोली 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ही गेल्या वर्षभरातील देशातील सर्वात मोठी कारवाई आहे. पोलिसांच्या सतर्कतेने नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे. या कारवाईत सहभागी पोलिसांचा सन्मान करण्यात येईल. नक्षलविरोधी कारवाईत सहभागी झालेल्या पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी बक्षीस देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. बक्षीसाची रक्कम अद्याप निश्चित केली नसली तरी, मोठी रोख रक्कम दिली जाईल, अशी माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली(Naxals attack in Gadchiroli Cash reward to be given to police; Testimony of Guardian Minister Eknath Shinde).

    मुंबई : सी-60 जवानांनी गडचिरोली 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ही गेल्या वर्षभरातील देशातील सर्वात मोठी कारवाई आहे. पोलिसांच्या सतर्कतेने नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे. या कारवाईत सहभागी पोलिसांचा सन्मान करण्यात येईल. नक्षलविरोधी कारवाईत सहभागी झालेल्या पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी बक्षीस देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. बक्षीसाची रक्कम अद्याप निश्चित केली नसली तरी, मोठी रोख रक्कम दिली जाईल, अशी माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली(Naxals attack in Gadchiroli Cash reward to be given to police; Testimony of Guardian Minister Eknath Shinde).

    हिंसा करणाऱ्यांना सोडणार नाही

    शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुर्नवसनासाठी शासनाचे धोरण आहे. यासाठी दहा कोटींची तरतूद केली आहे. त्यातून पोलिसांना बक्षीसाची रक्कम दिली जाईल. याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल. केंद्र व राज्याकडून नक्षलवादी परिसराच्या विकासासाठी निधी येतो. त्यातून रोख रक्कम देण्यात येईल. हिंसेचा मार्ग न सोडणाऱ्यांचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही. सुरजागढ येथी लोहखनिज प्रकल्प सरकार लवकरच पूर्ण करेल. यामुळे पाच हजार स्थानिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे. गडचिरोलीचा चेहरामोहराच बदलून टाकण्याची क्षमता या प्रकल्पात आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.