गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली शेतकऱ्याची हत्या

गडचिरोली - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तर गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या खुरापती वाढत चालल्या आहेत. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी एका शेतकऱ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे.

 गडचिरोली –  देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तर गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या खुरापती वाढत चालल्या आहेत. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी एका शेतकऱ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. नक्षलवाद्यांना शेतकरी पोलीसांचा खबरी असल्याचा संशय असल्यामुळे शेतकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. 

गडचिरोलीमधील एटापल्ली तालुक्याच्या गट्टा गावात शेतकरी राहत होता. या शेतकऱ्याचे नाव रवी पुगाटी वाय २८ वर्षे आहे. हा शेतकरी राहत्या घरी झोपला होता. मध्यरात्रीच्या सुमारास २५ ते २० नक्षली टोळक्यांनी आले. आणि शेतकऱ्याला उचले त्याच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याचा मृतदेह भेटला.