उभ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा; संबंधित विभागाचे दुर्लक्ष

सद्यस्थिती या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने केवळ एका बाजुची वाहतूक सुरू आहे. मात्र याच रस्त्याच्या दोन्ही बाजुला चारचाकी व दुचाकी वाहने उभ्या केली जातात. यामुळे आवागमन करणाऱ्या वाहनांना रस्ता उरत नाही.

    गडचिरोली. शहरातील चारही मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम मागील वर्षीपासून सुरू आहे. चामोर्शी मार्गावरही बांधकाम सुरू आहे. दरम्यान, या मार्गावर रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजुला चारचाकी व दुचाकी वाहने उभी राहत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.

    चामार्शीमार्गे सेमानाकडे प्रचंड वाहतूक वाढली आहे. सद्यस्थिती या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने केवळ एका बाजुची वाहतूक सुरू आहे. मात्र याच रस्त्याच्या दोन्ही बाजुला चारचाकी व दुचाकी वाहने उभ्या केली जातात. यामुळे आवागमन करणाऱ्या वाहनांना रस्ता उरत नाही. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित पोलिस विभाग व परिवहन विभागाने या वाहनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

    चंद्रपूर मार्गावर गतिरोधक उभारा
    शहरातून चंद्रपूरकडे जाणाऱ्या महामार्गाचे दोन्ही बाजुचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजुने वाहतूक सुरु आहे. रस्त्याचे बांधकाम झाल्याने अनेक दुचाकी, चारचाकी वाहनधारक या मार्गाने सुसाट वेगाने वाहने पळवित आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. संबंधित विभागाने या मार्गावर गतिरोधक उभारावे, जेणेकरुन सुसाट वेगाने वाहन पळविणाऱ्यांच्या वाहनांचा वेग कमी होईल.