शिक्षक, विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करा; जिल्हा शाळा मुख्याध्यापक संघाची मागणी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोफत कोरोना लसीकरण करावे, अशी मागणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

    आरमोरी (Aarmori).  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोफत कोरोना लसीकरण करावे, अशी मागणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

    जिल्ह्यात 2020-21 या सत्रातील शाळेचे वर्ग 5 ते 12 वीपर्यंतचे वर्ग भरविण्यात येत आहेत. अजूनही कोरोनाची भीती वाढतच आहे. शाळेत विद्यार्थी उपस्थिती फार कमी प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत शिक्षक, विद्यार्थी हे मानसिकदृष्ट्या सुदृढ राहावे व पालक-शिक्षकांमधील मनात असलेली भीती घालविता यावी, याकरिता सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाकडे शिक्षण विभागाकडून मागणी करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

    उपशिक्षणाधिकारी रमेश उचे यांनी निवेदन स्वीकारले. शिक्षणाधिकारी निकम यांच्याशी चर्चा करून त्याप्रमाणे आरोग्य विभागाला कळविण्यात येईल, असे उपशिक्षणाधिकारी उचे यांनी यावेळी सांगितले. निवेदन देताना मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मनीष शेट्ये, सचिव श्रीपाद वठे, मार्गदर्शक संजय नार्लावार, मार्गदर्शक तेजराव बोरकर, सदस्य विजय झोळे उपस्थित होते.