महाराष्ट्र पोलिस: केवळ संरक्षणच नव्हे तर सामाजिक दायित्वाचीही जाणीव
महाराष्ट्र पोलिस: केवळ संरक्षणच नव्हे तर सामाजिक दायित्वाचीही जाणीव

गडचिरोली जिल्ह्यात (In Gadchiroli district) पोलिस दलाकडून (Maharashtra Police Department) मंगळवारी एका विवाह समारंभात (wedding ceremony) मामाची भूमिका घेऊन पोलिसांनी वधूचे कन्यादानही पार पाडले. सध्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. (being appreciated)

    गडचिरोली (Gadchiroli).  जिल्ह्यात (In Gadchiroli district) पोलिस दलाकडून (Maharashtra Police Department) मंगळवारी एका विवाह समारंभात (wedding ceremony) मामाची भूमिका घेऊन पोलिसांनी वधूचे कन्यादानही पार पाडले. सध्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. (being appreciated)

    गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात माओवादी चांगलेच सक्रिय असतात. पोलिसांचे खबरी ठरवून अथवा अन्य आरोप करून माओवादी या तालुक्यातील नागरिकांची हत्या करीत असतात. एप्रिल महिन्यात माओवाद्यांनी बुर्गी येथील माजी उपसरपंच रामा तलांडे यांची हत्या केली होती. हत्या झाली त्यावेळी तलांडे हे त्यांची भाची सपना मंथनवार हिच्या विवाहाच्या तयारीत व्यस्त होते.

    सपनाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तलांडे यांच्यानंतर तिचा विवाह कोण पार पाडणार, असा प्रश्न मंथनवार कुटुंबीयांपुढे निर्माण झाला. त्यामुळे मुलीच्या विवाहाच्या चिंतेत असलेल्या सपनाच्या आईने थेट बुर्गी पोलिसांकडे धाव घेतली. मंथनवार यांची परिस्थिती माहिती असल्याने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी तिच्या विवाहाची जबाबदारी स्वीकारली आणि ते तयारीला लागले.

    विवाहाची तयारी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. यावेळी पोलिसांनी मामाची भूमिका स्वीकारत सपनाचे कन्यादान केले आणि नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. पोलिस उपनिरीक्षक कैलास आलुरे, दशरथ बुरकुल आणि श्रीकृष्ण शिंदे या अधिकाऱ्यांसह पोलिस दलातील इतर कर्मचाऱ्यांनी सपनाच्या संसारासाठी साहित्य उपलब्ध करून दिले.

    विवाह समारंभाला उपस्थित असलेल्या नागरिकांनी रामा तलांडे यांच्या हत्येचा निषेध केला. ‘पोलिसांनी दाखवलेल्या या औदार्यामुळे सपनाच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली आहे. माओवाद्यांच्या दहशतीच्या छायेत जगत असलेल्या नागिरकांच्या पाठीशी पोलिस दल उभे असल्याची भावना अशा प्रसंगांमधून निर्माण होते,’ असे मत यावेळी एका नागरिकाने व्यक्त केले.