अतिसंवेदनशील गावात अधिकाऱ्यांची भेट; कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्याचा प्रयत्न

 गडचिरोली जिल्हा आदिवासीबहूल, नक्षल प्रभावित, अविकसित भाग म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील अनेक दुर्गम व ग्रामीणभागात पक्के रस्ते, नदीवर पुलाचीनिर्मिती नाही. त्यामुळे या भागात पोहचून सेवा देणे मोठे आव्हान ठरते.

  अहेरी/गडचिरोली तालुक्यातील अनेक गावे आजही विकासापासून कोसो दूर आहे, गावामध्ये जाण्यासाठी रस्तेच नाही, नाल्यावरून पुलाचीनिर्मिती नाही, गावात वीज नाही अशा गावांमध्ये जाण्यासाठी अधिकारी वर्ग आजही मागेपुढे करत असतात हे वास्तविक सत्य आहे. मात्र, येथील बालविकास प्रकल्प अधिकारी बी. के. गडधे यांनी तालुक्यापासून 72 किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्याचा शेवटच्या टोकावर अतिदुर्गम व अतिसंवेदनशील म्हणून परिचित असलेल्या दुर्गम गावांना भेट देऊन त्यांची समस्या जाऊन घेणारे पहिले बालविकास प्रकल्प अधिकारी ठरले आहेत.

  गडचिरोली जिल्हा आदिवासीबहूल, नक्षल प्रभावित, अविकसित भाग म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील अनेक दुर्गम व ग्रामीणभागात पक्के रस्ते, नदीवर पुलाचीनिर्मिती नाही. त्यामुळे या भागात पोहचून सेवा देणे मोठे आव्हान ठरते. या स्थितीत तालुकास्थळापासून 72 किमी अंतरावरील अतिदुर्गम व अतिसंवेदनशील म्हणून परिचित असलेल्या चिटवेली, तोंडेर, चिंतारवेला, सकीनगटा, रेगुलवाही, मुडेवाही, कुरुमपल्ली, कोडसेपल्ली, रापल्ली, दामरंचा, आसा, नैनगुंडम, नैनेर, कोंजेड, तोडका, लोहा कल्लेड, देचलीपेठा, मांड्रा, रुमलकसा आदी गावांना त्यांनी भेट देऊन तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना, 3- 6 वर्षांच्या बालकांना, गर्भवती व स्तनदा मातांना, 15 ते 45 वर्षांच्या अन्य महिलांना आणि 11 तर 18 वर्षाच्या किशोरीना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

  एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, वाढीवर देखरेख, संदर्भसेवा, अमृत आहार, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण, गर्भवती महिलांना टिटनसची लस टोचणे, पोषण व आरोग्य शिक्षण देणे सोबतच किशोरी वयाच्या मुलींना लोहयुक्त व जंतनाशक गोळ्या, हिमोग्लोबिन व बॉडीमास इंडेक्स तपासणी, त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलींना आरोग्य व स्वच्छता, पोषण आहार, जीवन कौशल्य, व्यावसायिक प्रशिक्षण आणि अभ्यासदौरा आदी अतिसंवेदनशील क्षेत्रातील लाभार्थ्यांना मिळाल पाहिजे म्हणून स्वतः बी. के. गडधे यांनी लक्ष देऊन लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिले आहेत.

  बालमृत्यू, कुपोषण आणि शाळा सोडणाऱ्या बालकांच्या संख्येत घट घडवून आणले. बालकांच्या योग्य मानसिक शारीरिक व सामाजिक विकासासाठी पाया अधिक मजबूत करणे आणि सहा वर्षाखालील वयाच्या बालकांना पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे काम करून आदिवासी, माडिया समाजातील नागरींना या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून मार्गदर्शन करून त्यांना लाभ मिळून देण्याचे काम करणारे पहिले अधिकारी म्हणून त्यांची ओळख झाली आहे.

  कोरोनाच्या काळात त्यांनी लॉकडाऊन असतांना लाभार्थ्यांना पोषक आहार मिळाव म्हणून अंगणवाडी परिसरात परसबागेची लागवड केली. बागेतून ताज्याभाज्या काढून किशोरवयीन मुलींना पोषक आहार बनवून खायला द्यायचे असे अनेक कामे बाल विकास प्रकल्प अधिकारी बी. के. गडधे यानी केले.

  स्वत: गावात जाऊन करतात मार्गदर्शन

  बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत अहेरी, आलापल्ली, महागाव, पेरमिली, कमलापूर, जीवनगट्टा, देचलीपेठा आदी सहा परिक्षेत्र आहेत. या क्षेत्रातील नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जनजागृती करण्यासाठी बाल विकास अधिकारी स्वत: गावात पोहचून नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच गर्भवती व स्तनता मातांसह किशोरवयीन युवतींना आरोग्यासंबंधी मार्गदर्शन करीत आहेत. दुर्गम क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे प्रशंसा होत आहे.

  स्थानिक भाषेत जनजागृती

  जिल्ह्यातील दुर्गम भागात आदिवासी माडिया, गोंडी भाषा बोलली जाते. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या भाषेचे ज्ञान नसल्याने आदिवासींसी संवाद साधतांना अडचणी येतात. मात्र, या बाबीचा बावू न करता बाल विकास अधिकारी गडधे स्थानिक भाषकाला सोबतीला घेऊन आदिवासी नागरिकांना त्यांच्या भाषेत आरोग्याबाबत मार्गदर्शन व जनजागृती करीत आहेत.