121 cases of MSEDCL settled, arrears of Rs. 15.80 lakhs recovered

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील हजारो थकबाकीदारांना नोटीस देऊन राष्ट्रीय लोक अदालतमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. लोक अदालतमध्ये अनेक ग्राहक उपस्थित झाले. या अदालतीमध्ये १२१ प्रकरणांच्या सामोपचाराने निपटारा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून १५ लाख ८० हजार रुपये थकीत बिल वसूल करण्यात आले.

    गोंदिया : महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांना दिलासा मिळावा या उद्देशाने महावितरणने थकीतदारांना नोटीस देऊन लोक अदालतमध्ये प्रकरणाचा निपराटा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. लोकअदालतमधून महावितरणच्या एकूण १२१ ग्राहकांकडून १५ लाख ८० हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. हे सर्व प्रकरण लोक अदालतच्या माध्यमातून सामोपचाराने काढण्यात आले आहे.

    गोंदिया-भंडारा परिमंडळाकडून लाखो ग्राहकांना वीज पुरविली जात आहे. मात्र, अनेक असे ग्राहक आहेत की, वेळेवर विद्युत बिल भरत नाही. त्यामुळे या ग्राहकांवर बिल वाढत जाते. एवढेच नव्हे, तर अनेकांकडून वीज चोरीची प्रकरणे सुद्धा उघडकीस आली आहेत. गोंदिया-भंडारा परिमंडळामध्ये हजारो ग्राहकांवर लाखो रुपयांचे बिल असल्यामुळे नियमानुसार त्यांचे कनेक्शन खंडित करण्यात आले होते. अशा ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून लोक अदालतच्या माध्यमातून समोपचाराने प्रकरणे निकाली काढण्याचा मानस महावितरणने केला आहे. 

    राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील हजारो थकबाकीदारांना नोटीस देऊन राष्ट्रीय लोक अदालतमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. लोक अदालतमध्ये अनेक ग्राहक उपस्थित झाले. या अदालतीमध्ये १२१ प्रकरणांच्या सामोपचाराने निपटारा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून १५ लाख ८० हजार रुपये थकीत बिल वसूल करण्यात आले. एवढेच नव्हे तर महावितरणकडून विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ पण दिल्या जात आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनसुद्ध करण्यात आले आहे. लोकअदालतमध्ये निपटारा करण्यासाठी गोंदिया भंडारा परिमंडळचे मुख्य अभियंता बी.ए. वासनिक, अधीक्षक राजेश नाईक, सम्राट वाघमारे, कार्यकारी अभियंता शरद वानखेडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र जैन, सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत मडावी, कनिष्ठ विधी अधिकारी राहुल खंडारे, अभय मेश्राम व केशव बहेकार यांनी प्रयत्न केले.