झोपेतच असताना काळाने केला घात, निर्माणाधीन इमारतीत दोन मजुरांची निर्घृण हत्या ; आरोपी मजूर पसार

नव्या आणि निर्माणाधीन इमारतीत दोन मजुरांची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी या भागात घडली.

    गोंदिया : नव्या आणि निर्माणाधीन इमारतीत दोन मजुरांची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी या भागात घडली. मजूर झोपेत असतानाच काळाने मोठा घात केला. परंतु हत्येनंतर त्यांच्यासोबत राहणारा एक मजूर पसार झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेले दोेन्ही मजूर हे मूळ उत्तर प्रदेशातील होते. अमन आणि निरंजन अशी मृत झालेल्या मजुरांची नावं आहेत. तर पसार झालेल्या मजुराचे नाव बलवान असं आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास नवनिर्मित इमारतीत चार मजूर झोपले होते. यापैकी दोेघांची झोपेतच निर्घण हत्या करण्यात आली. तर एक मजूर घटनास्थळावरून पसार झाला आहे. तर दुसऱ्या मजुराने या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना दिली आहे.

    दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या सर्व प्रकरणाची चाचपणी केली. मृत मजुरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पुढील घटनेचा तपास येथील पोलीस करत आहेत.