आरोग्य विभाग गोंदिया इथे 24,000 रुपये पगाराची नोकरी; आत्ताच करा अर्ज

  गोंदिया : आरोग्य विभाग ज़िल्हा परिषद गोंदिया इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मानसोपचार वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.

  पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  या पदांसाठी भरती

  मानसोपचार वैद्यकीय अधिकारी – एकूण जागा 02

  पात्रता आणि अनुभव

  मानसोपचार वैद्यकीय अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BAMS ची पदवी पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

  किती मिळणार पगार?

  मानसोपचार वैद्यकीय अधिकारी आदिवासी विभागाकडून 6,000/- रुपये तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून 18,000/- रुपये देण्यात येतील. म्हणजेच एकूण 24,000/- रुपये पगार दिला जाणार आहे.

  निवड प्रक्रिया कशी असेल?

  या पदभरतीसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर उपास्थित राहावं लागणार आहे.

  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2021