
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये(Live In Relation) राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकारनं मित्रांच्या मदतीनं हत्या (Boyfriend Killed Girlfriend) केल्याचे उघडकीस आले आहे.
गोंदिया: गोंदियामध्ये(Gondia) धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकारनं मित्रांच्या मदतीनं हत्या (Boyfriend Killed Girlfriend) केल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास चिचगड पोलीस करत आहेत.
हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी एक महिन्यानं खूनाची उकल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य दोघांना अटक केली आहे. आरोपींनी मृत तरुणीला जंगलात नेऊन तिची निर्घृण हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
खरंतर २३ जून रोजी गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढासगड याठिकाणी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला होता. आरोपींनी गळ्यावर, डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करत तिची हत्या केल्याचं उघड झालं होतं. मात्र संबंधित तरुणी नेमकी कोण आणि तिची हत्या कोणी केलं, याच गूढ बनलं होतं. पोलिसांनी मृत तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तरुणीची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी तपास करत प्रियकरासह दोन साथीदारांना ताब्यात घेतलं आहे.
समीर शेख असं अटक केलेल्या प्रियकर तरुणाचं नाव आहे. तर आसिफ पठाण (वय आणि प्रफुल शिवणकर अशी अटक केलेल्या अन्य दोन तरुणांची नावे आहेत. आरोपी समीर हा गेल्या काही काळापासून मृत तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. दरम्यान मृत तरुणीनं समीरकडे लग्नाचा तगादा लावला. पण समीरला लग्न करायचं नव्हतं.
प्रेयसीनं लग्नाचा तगादा लावल्यानं संतापलेल्या समीरनं प्रेयसीचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी त्यानं मित्र आसिफ आणि प्रफुल या दोघांशी चर्चा केली. यानंतर आरोपी प्रियकरानं फिरण्याच्या बहाण्यानं प्रेयसीला ढासगड येथील जंगलात नेलं. याठिकाणी आरोपीनं आपल्या मित्रांच्या मदतीनं प्रेयसीवर धारदार शस्त्रानं वार केले. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीचा मृतदेह जंगलात ओढून नेऊन टाकला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.