
होळी पेटविताना सर्व भागातील विज वाहिण्या किंवा वितरण रोहित्रो खुले आहेत की नाही, याची तपासणी करून घ्यावी. तसेच, होळीच्या जवळ वीज वाहिन्या किंवा जिवंत तार नसल्याची शहानिशा करुणाच होळी दहन करावे.
गोंदिया : होळी हा उत्साहाचा व आनंदाचा पर्व आहे. जनतेच्या या सणाला कोणतेही गालबोट येऊ नये, त्याकरिता नागरिकांनी , विशेष तर लहान मुलांनी आवश्यक खबरदारी घ्यावी आणि ही होळी उत्साहाने, आनंदाने साजरा करावा, असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे.
होळी पेटविताना सर्व भागातील विज वाहिण्या किंवा वितरण रोहित्रो खुले आहेत की नाही, याची तपासणी करून घ्यावी. तसेच, होळीच्या जवळ वीज वाहिन्या किंवा जिवंत तार नसल्याची शहानिशा करुणाच होळी दहन करावे, त्याचबरोबर विद्युत खांबांपासून दूर अंतरावर होळी पेटवावी, यामुळे होळीच्या धोक्यापासून वीज वाहिन्या सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. तसेच, पाण्याचे फवारे वीज वाहिन्यांपर्यंत उडणार नाही, याची काळजी सर्व मुलांना देण्यात यावी.
रंग भरलेले फुगे फेकताना, ते विजेचे खांब आणि विजवाहिन्या, यांना लागणार नाही, याची काळजी घ्यावी. होळी पेटविताना शक्यतो, मोकळ्या जागेचा वापर करावा. ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा विजेचे अपघात, हे प्राणघातक असल्याने, एक चूकही प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरू शकते. त्यासाठी विशेष करून महावितरणची यंत्रणा सज्ज असते. दुर्लक्षामुळे वीजेशी संबंधित कोणतीही दुर्घटना होऊ नये. उत्साहाचा हा सण सर्व सामान्य जनतेनी उत्साहाने पार पडावा, असे आवाहन महावितरण गोंदिया परिमडळातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.