एकाच कुटुंबातील चौघांची अमानूषपणे हत्या; घरात आढळला रक्ताचा सडा

२१ सप्टेंबरच्या पहाटे बिसेन कुटुंबियांच्या घरी अज्ञात मारेकऱ्यांनी प्रवेश करून साखर झोपेत असलेल्या लोकांवर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने डोक्यावर वार करून झोपेत असलेल्या लोकांवर वार करून ठार करण्यात आला. मालता रेवचंद बिसेन ह्या एका बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.

    तिरोडा (Tiroda) : गोंदिया जिल्ह्यातील (Gondia district) तिरोडा तालुक्यात ()(Tiroda taluka) येणाऱ्या चुरडी (shocking incident at Churdi) येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. सकाळी १० वाजता ड्रायव्हर वाहन घेऊन जाण्यासाठी आला असता त्याला घरात चार मृतदेह दिसून आले. एकाच कुटुंबातील चौघांचा खून (the murder of four members of the same family) हा व्यावसायिक स्पर्धेतून (murder due to business competition or wealth) झाला की संपत्तीतून झाला हे सांगता येत नाही. आतापर्यंत या खुनाचा उलगडा झाला नाही. एकाच कुटुंबातील चौघांचा खून करणाच्या आरोपींमध्ये अनेक आरोपींचा समावेश असावा, असा कयास लावला जात आहे.

    गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायीक रेवचंद डोंगरु बिसेन (५१), मालता रेवचंद्र बिसेन (४५), पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०), तेजस रेवचंद बिसेन (१७) अशी एकाच कुटुंबातील मृत चौघांची नावे आहेत. रेवचंद डोंगरु बिसेन यांच्याकडे ३ मेटॅडोर व एक ट्रॅक्टर आहे. ते ट्रान्सपोर्टचे काम करतात. रेशनचे धान्य ट्रान्सपोर्ट करण्याचे काम ते करीत होते.

    २१ सप्टेंबरच्या पहाटे बिसेन कुटुंबियांच्या घरी अज्ञात मारेकऱ्यांनी प्रवेश करून साखर झोपेत असलेल्या लोकांवर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने डोक्यावर वार करून झोपेत असलेल्या लोकांवर वार करून ठार करण्यात आला. मालता रेवचंद बिसेन ह्या एका बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. बहिण पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व भाऊ तेजस रेवचंद बिसेन (१७) हे दुसऱ्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला. गळफास लावलेला दोर दारातून खिडकीला बांधून ठेवला होता.

    आरोपींनी नियोजनबध्द पध्दतीने हा खून नाही आत्महत्या वाटावा यासाठी रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला होता. या घटनेची माहिती मिळताच तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव व पोलीस अधिक्षक विश्व पानसरे घटनास्थळावर दाखल झाले. मारण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टरचा स्पेंडल हा घटनास्थळपासून घराच्या व-्हाड्यांतच १५ फूट अंतरावर फेकलेला आढळला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तिरोडाच्या उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आला.

    ९० वर्षाची म्हातारीच राहीली जिवंत रेवचंद डोंगरु बिसेन यांच्या आई खेमनबाई डोंगरू बिसेन ह्या आजघडीला ९० वर्षाच्या आहेत. त्या समोरच्या खोलीत आपल्या खाटेवर झोपल्या होत्या. आरोपी मागच्या दारातून आले आणि त्यांनी या चौघांना संपविले तरी खेमनबाई यांना या घटनेचा सुगावा नसावा. या म्हाताऱ्या खेमनबाई यांना या घटनेचे काय माहिती आहे यावरूनही पोलिस धागेदोरे जोडतील.