गोंदिया-चंद्रपूर दरम्यान रेल्वे सुरू करा; नागरिकांची मागणी

गोंदिया-बल्लारशा मार्गावरील लोकल ट्रेन अनेक दिवसापासून बंद आहे. वर्ष लोटूनसुध्दा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. ग्रामीण भागात प्रवाशांच्या सोई या मर्यादित असतात.

    गोंडउमरी (Gondumari).  गोंदिया-बल्लारशा मार्गावरील लोकल ट्रेन अनेक दिवसापासून बंद आहे. वर्ष लोटूनसुध्दा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. ग्रामीण भागात प्रवाशांच्या सोई या मर्यादित असतात. कोरोना काळात अनेक ठिकाणी बस, रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्याने कामासाठी ये-जा करणाऱ्या मजूर व प्रवाशांना अनेक संकटांना समोरे जावे लागले.

    कित्येकांना पायीच आपल्या गंत्यव्यापर्यंत पोहचावे लागले. काही महिन्यापूर्वी बस गाड्या सुरू झाल्या. परंतु, त्याही काही मर्यादित ठिकाणापर्यंत. पण अजूनपर्यंत लोकन ट्रेन सुरू करण्याची परवानगी शासनाने दिलेली नाही. या भागातील अनेक मजुरांना प्रवाशासाठी लोकल ट्रे न एक प्रवासाचे एक उपयुक्त साधन आहे. अनेक मजुरांचा लोकल ट्रेनने मोठया शहरांपर्यंत कमी पैशात प्रवास सोयीयुक्त होतो.

    गोंदिया-बल्लारशा मार्गावरील लोकल ट्रे न अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे अनेक मजुरांना बस किंवा खाजगी वाहनाने महागडे प्रवास करण्याची वेळ आली आहे. यामुळे मिळालेल्या मजुरीचा अधिक वाटा हे प्रवासातच खर्च होत आहे. त्यामुळे लोकल सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी प्रवासी, मजुरांनी केली आहे.