
पोलिसांनी जंगलात धाड घातली असता, तीन ते चार व्यक्ती मोहफुलाची दारु गाळत असल्याने पोलिसांनी दिसले. मात्र पोलिसांना बघून ते व्यक्ती पसार झाले. पळून गेलेल्यांमध्ये संजय गोविंदा बरीयेकर, स्वप्नील हंसराज मेश्राम, सत्यशील चिंदू बनसोड, अंकूश प्रकाश येशने यांचा समावेश आहे.
चिखली : तिरोडा पोलिसांनी निलागोंदी शिवारात धाडसत्र राबविले. या ठिकाणी मोहफुलाची दारु गाळत असलेले आरोपी पोलिसांनी बघून पळाले. घटनास्थळावरून साडेचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिरोडा पोलिसांचे पथक गस्तीवर असताना सिल्ली ते निलागोंदी झुडपी जंगलात सिल्ली येथील संजय सोविंदा बरीयेकर हा मोहफुलाची दारु गाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
हे सुद्धा वाचा
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगलात धाड घातली असता, तीन ते चार व्यक्ती मोहफुलाची दारु गाळत असल्याने पोलिसांनी दिसले. मात्र पोलिसांना बघून ते व्यक्ती पसार झाले. पळून गेलेल्यांमध्ये संजय गोविंदा बरीयेकर, स्वप्नील हंसराज मेश्राम, सत्यशील चिंदू बनसोड, अंकूश प्रकाश येशने यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून मोहफुलाची दारु आणि दारू गाळण्याकरिता लागणारे साहित्य असा एकूण ४ लाख ६६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. सडवा आणि दारु नष्ट करण्यात आला. आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.