प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

24 वर्षीय पीडित तरुणी आपल्या वडिलांसोबत उपचारासाठी दवाखान्यात गेली होती. यावेळी डॉक्टरनेच तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे ही घटना घडली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलीसांनी लंपट डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे.

    गोंदिया (Gondia) : उपचारासाठी (treatment) गेलेल्या तरुणीचा (a young woman) डॉक्टरनेच विनयभंग केल्याची (Girl molested by a doctor) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील (Gondia district) कट्टीपार भागात (Kattipar area) हा प्रकार घडला. या प्रकरणी आमगाव पोलिसात (Amgaon police) डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गोंदियात राहणारी 24 वर्षीय पीडित तरुणी आपल्या वडिलांसोबत उपचारासाठी दवाखान्यात गेली होती. यावेळी डॉक्टरनेच तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे ही घटना घडली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलीसांनी लंपट डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. हरीणखेडे असे आरोपी डॉक्टरचे नाव असल्याची माहिती आहे.

    नागपुरात वरिष्ठ डॉक्टरकडून अतिप्रसंग (An overdose from a senior doctor in Nagpur)
    दरम्यान, वरिष्ठ डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. 25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला होता. या प्रकरणी वरिष्ठ डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या.

    नालासोपाऱ्यात डॉक्टरकडून नर्सचाच विनयभंग
    (Nurse molested by doctor in Nalasopara)
    मुंबईजवळच्या नालासोपारा भागात डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये 21 वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी डॉक्टर परागंदा झाला होता.

    नागपूरमध्ये मानकापूर परिसरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. सिनीअर डॉक्टरने 25 वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चेंजिंग रुममध्ये बोलवून त्यांनी डॉक्टरशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला गेला.