विदर्भात गारठा वाढणार; पाकिस्तानचे चक्री वारे विदर्भाच्या दिशेने

गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात चक्राकार वारे निर्माण झाले आहे. परिणमी वार्‍याची दिशा विस्कळीत होऊन तापमानात चढ उतार होत होते.

नागपूर. मागील काही दिवसांपासून विदर्भात कडाक्याची थंडी (winter) असतानाचा आता पाकिस्तानमधील चक्री वार्‍यामुळे, हिमालयातील थंड वारे विदर्भात (vidarbha) प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या २९ तारखेपासून विदर्भात पुन्हा थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात चक्राकार वारे निर्माण झाले आहे. परिणमी वार्‍याची दिशा विस्कळीत होऊन तापमानात चढ उतार होत होते. त्याचा परिणाम विदर्भातील तापमानावर झाल्याने पारा आठ अंशावर येत होता. त्यानंतर आता हिमालयाच्या पश्‍चिमेकडून वाहणार्‍या वार्‍यामुळे त्या ठिकाणी बर्फवृष्टी होणार असल्याची शक्यता आहे. परिणामी उत्तरकेडून थंड वारे दक्षिणेकडे वाहण्याची शक्यता आहे. उत्तरे कडून दक्षिणकडे वाहणारे वारे सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा विदर्भात तापमान कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.