नागपुरात मंगळवारी ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; Active रुग्णसंख्या ५० च्या खाली

    नागपूर (Nagpur): नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. शहरात मंगळवारी केवळ 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. शहरात आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

    नागपूर शहरात मंगळवारी पहिल्यांदाच कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 50 च्या खाली आली आहे. शहरात मंगळवारी 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालातून कळले. आरोग्य विभागाच्या प्रभावी उपचारामुळे शहरातील 06 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले. आरोग्य विभागाने मंगळवारी 2348 नागरिकांची कोरोना टेस्टिंग केली. यापैकी 2341 जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला.

    कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मनपाचा आरोग्य विभाग प्रभावी उपचार पद्धतीसोबतच लसिकरणावरही भर देत आहे. शहरात मंगळवारी 14 लाख 30 हजार 722 नागरिकांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. यासह 7 लाख 13 हजार 309 नागरिकांनी कोरोनाची दुसरी लस घेतली. मंगळवारी प्राप्त झालेली लसिकरणाची एकूण आकडेवारी 21 लाख 44 हजार 31 इतकी नोंदविली गेली.

    कोरोनाची तिसरी लाट रोखणे ही आपली सार्वजनिक जबाबदारी आहे. यासाठी आपण प्रशासनाने ठरवून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करावे असे आवाहन ‘नवराष्ट्र न्यूज नेटवर्कतर्फे’ करण्यात येत आहे.