नागपुरात शुक्रवारी ४०९५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले; ३५ जणांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी 4095 नवीन कोरोनाबाधित रुग्णांनी नोंद करण्यात आली. हा मागील आठवड्यातील सर्वांत मोठा उच्चांक आहे. आज जिल्ह्यात कोरोनामुळे 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    नागपूर (Nagpur).  जिल्ह्यात शुक्रवारी 4095 नवीन कोरोनाबाधित रुग्णांनी नोंद करण्यात आली. हा मागील आठवड्यातील सर्वांत मोठा उच्चांक आहे. आज जिल्ह्यात कोरोनामुळे 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    कोरोना रुग्णांची एकूण ताजी आकडेवारी 2 लाख 11 हजार 162 इतकी पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण मृतकांची संख्या 4819 इतकी झाली आहे. अधिकृत अहवालानुसार एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांपैकी 1126 ग्रामीण भागातील आहेत. यासह 2966 रुग्ण नागपूरच्या शहरी भागातील आहेत. याव्यतिरिक्त 3 कोरोना रुग्ण नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. आजच्या मृत व्यक्तींपैकी 18 व्यक्ती नागपूर जिल्ह्यातील आहेत.

    3 मृत व्यक्ती नागपूर बाहेरील आणि 14 जण नागपूरच्या ग्रामीण भागातील आहेत. एकूण कोरोना रुग्णांपैकी 36 हजार 936 रुग्ण होम क्वाॅरंटाईन करण्यात आले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 80.23 टक्के आहे.