नागपुरात शुक्रवारी आढळले ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; Active रुग्णांची संख्या वाढतीवर

    नागपूर (Nagpur): केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसिकरण कार्यक्रमाचे (The Corona Prevention Vaccination Program) नागपूर मनपाच्या (Nagpur Municipal Corporation.) आरोग्य विभागाकडून (the Health Department) काटेकोरपणे पालन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर शहरात शुक्रवारी 13 लाख 47 हजार 864 रुग्णांना कोरोनाची पहिली लस (the first corona vaccine) टोचण्यात आली. आज 6 लाख 30 हजार 113 नागरिकांना कोरोनाची दुसरी लस टोचून घेतली. नागपुरात आज केवळ 05 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली.

    नागपूर शहरात सध्या 59 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रभावी उपचार पद्धतीमुळे शहरातील 08 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मनपाच्या आरोग्य केंद्रावर शुक्रवारी 3896 कोरोना संशयित नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 3891 चाचण्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आढळून आला. नागपूर शहरात कोरोनामुळे शुक्रवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.

    नागपूर मनपाच्या आरोग्य विभागाने कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना लसिकरणावर भर दिला आहे. शहरात आज 13 लाख 47 हजार 864 नागरिकांनी कोरोनाची पहिली लस टोचून घेतली. कोरोना प्रतिबंधक दुसÚया क्रमांकाची लस टोचणा रुग्णांची संख्या 6 लाख 30 हजार 113 इतकी आहे. शहरात आज एकूण 19 लाख 77 हजार 977 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली. शहरात लॉकडाउनमध्ये सूट देण्यात आल्यामुळे भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. नागरिकांनी हा धोका टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन शहर महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.