नागपुरात सोमवारी आढळले 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; अॅक्टिव्ह रुग्णसंख्या नियंत्रित आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

    नागपूर (Nagpur) : उपराजधानीत कोरोना व्हॅक्सिनेशनचे (Corona vaccination) सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. नागपूर शहरात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (corona positive patients) संख्या 8 इतकी नोंदविण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट रोखायची असल्यास कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्या (corona active patients) आटोक्यात आणणे आवश्यक आहे. सोमवारी शहरात 64 कोरोना Active रुग्णांची नोंद करण्यात आली.

    नागपूर मनपाच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या कोरोनावरील प्रभावी उपचार पद्धतीमुळे सोमवारी 06 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. शहरात सोमवारी एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडूुन कोरोना टेस्टिंग वाढविण्यात आले आहे. सोमवारी 2664 कोरोना संशयित नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी 2653 नागरिकांच्या चाचण्या निगेटिव्ह आढळून आल्या.

    प्रशासनाकडून कोरोना व्हॅक्सिनेशनचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. शहरात सोमवारी 13 लाख 71 हजार 441 नागरिकांनी कोरोनाची पाहिली लस टोचून घेतची. कोरोना व्हॅक्सिनेशनच्या दुसच्या लसीच्या डोजचा आकडा 6 लाख 56 हजार 957 इतका नोंदविण्यात आला. शहरात सोमवार पर्यंतची एकूण लसिकरणाची आकडेवारी 20 लाख 28 हजार 398 इतकी नोंदविण्यात आली.