
मुख्य आरोपी मोहम्मद चांद कुरेशी आणि मोहम्मद सादिक साबीर हे दोघे मुलीला पळवून घेऊन जाण्यासाठी दिल्लीहून पुलगाव याठिकाणी आले. त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी पीडित मुलगी घराबाहेर पडल्यानंतर आरोपी तिला घेऊन नागपूरला आले. नागपुरातून दिल्लीला रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी ....
नागपूर (Nagpur) : वर्ध्यातील एका अल्पवयीन मुलीने वडिलांनी ऑनलाइन शिक्षणासाठी घेऊन दिलेल्या फोनचा वापर भलत्याच कारणासाठी केला आहे. पीडित मुलीने सोशल मीडियाचा (minor girl use social media) वापर करायला सुरुवात केल्याने, दिल्लीच्या एका तरुणाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं (Trapped in love affair) होतं. तसेच पीडित मुलीला दिल्लीला पळवून नेण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन आरोपींसह पीडितेला नागपूर पोलिसांनी ताब्यात (2 arrested) घेतलं आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने पीडित मुलीची सुटका करण्यात यश आलं आहे.
पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ती पुलगाव येथील रहिवासी आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी वडिलांनी पीडित मुलीला स्मार्टफोन घेऊन दिला होता. यानंतर मुलीने सोशल मीडिया वापरायला सुरुवात केली. यानंतर तिची ओळख दिल्लीतील जहागिरपुरी येथील रहिवासी असणाऱ्या मोहम्मद चांद कुरेशी मोहम्मद इस्लाम कुरेशी याच्याशी झाली. त्यानंतर दोघंही बरेच दिवस व्हॉट्सअॅपवरून एकमेकांच्या संपर्कात होते. हा प्रकार सुमारे तीन महिने सुरू होता.
दरम्यान, 20 सप्टेंबर रोजी मुख्य आरोपी मोहम्मद चांद कुरेशी आणि मोहम्मद सादिक साबीर हे दोघे मुलीला पळवून घेऊन जाण्यासाठी दिल्लीहून पुलगाव याठिकाणी आले. त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी पीडित मुलगी घराबाहेर पडल्यानंतर आरोपी तिला घेऊन नागपूरला आले. नागपुरातून दिल्लीला रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी आरोपींना नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलं आहे. तांत्रिक तपास केल्यानं मुलीची सुटका करणं पोलिसांना शक्य झालं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.