प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरूणाने केली प्रेयसीची हत्या; दोषीला जन्मठेपेची शिक्षा

1 जुलै 2018 च्या रात्री 8.15 वाजताच्या सुमारास याच कारणावरून दोघांत भांडण झाले. दरम्यान रोहितने सोबत आणलेले कटर काढून सानिकावर वार करून तिचा खून केला होता. आता याप्रकरणी न्यायालयाने दोषीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

    नागपूर : प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रेयसीला ठार मारणाऱ्या आरोपीस सत्र न्यायाधीश एस. एम. कणकदंडे यांनी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे मुलीच्या जन्मदिवशीच तिच्या मारेकऱ्याला ही कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.

    रोहित मनोहर हेमनानी उर्फ भोलानी (वय 25, रा. सिंधी कॉलनी, खामला) असे दोषीचे नाव आहे. मृत तरुणी सानिका उर्फ टीनू प्रदीप थुगावकर (वय 19, रा. विनायक अपार्टमेंट, लक्ष्मीनगर) ही सोमलवार महाविद्यालयात टेक्सटाईल पदविका अभ्याक्रमाला शिकत होती. रोहित आणि सानिकामध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, रोहितच्या वागणुकीमुळे सानिकाने त्याच्यापासून दुरावा केला होता. त्यामुळे रोहित संतापलेला होता.