‘कलम ३७० रद्द केल्यानंतरही जम्मू -काश्मीरची समस्या सुटली नाही’ – मोहम भागवत

जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सेना नाही तर मानवी अधिकाराच्या नावावर भारतीय सेनेला लक्ष केले जात आहे. 370 कलमानंतर व्यवस्था बदलली पण तरी हे संकट अद्याप टळलं नाही. हे खूप दुख:दायक आहे. त्यामुळं आपण स्वस्थ राहून चालणार नाही, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारला दिला आहे.

    नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, कलम 370 रद्द केल्यानेही जम्मू -काश्मीरची समस्या सुटली नाही. ते शनिवारी नागपुरातील एका कार्यक्रमात म्हणाले की, जम्मू -काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370 च्या बहुतेक तरतुदी रद्द केल्यानंतरही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. आजही तेथील लोकसंख्येचा एक भाग स्वातंत्र्याबद्दल बोलतो. नागपुरात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान भागवत म्हणाले की, समाजाने लोकसंख्येच्या या भागापर्यंत पोहोचले पाहिजे जेणेकरून ते भारताशी एकरूप होऊ शकतील.

    जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सेना नाही तर मानवी अधिकाराच्या नावावर भारतीय सेनेला लक्ष केले जात आहे. 370 कलमानंतर व्यवस्था बदलली पण तरी हे संकट अद्याप टळलं नाही. हे खूप दुख:दायक आहे. त्यामुळं आपण स्वस्थ राहून चालणार नाही, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारला दिलाय.

    मोहन भागवत यांनी यावेळी अनुच्छेद ३७० रद्द करण्याआधी जम्मू काश्मीरसाठी दिला जाणारा ८० टक्के निधी राजकारण्यांच्या खिशात जात होता असा आरोपही केला आहे. ते म्हणाले की, “अनुच्छेद ३७० रद्द करण्याआधी काश्मीर खोऱ्यासाठी केलं जात होतं त्यापैकी ८० टक्के लोकांपर्यंत न जाता राजकीय नेत्यांच्या खिशात पोहोचत होतं. आता अनुच्छेद रद्द केल्यानंतर काश्मीऱ खोऱ्यात विकास होताना आणि इतर फायदे मिळताना दिसत आहेत”.

    दरम्यान, काहीजण विकासाचं समर्थन करणारा वर्ग आहे. 370 व्यवस्था बदलली पण मात्र अद्याप संकट टळलं नाही. आपण स्वस्थ बसून चालणार नाही, असं भागवत यांनी म्हटलं आहे.