Alexander, a drug addict, commits theft at Nagpur railway station

मागच्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील बोगीतून नेहमीच नळ चोरीला जात होते. ही घटना वारंवार घडत असल्याने रेल्वे सुरक्षा दलाचे जवान विचारात पडले होते. 

    नागपूर : संपूर्ण भारतभर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच फार मोठ जाळ विणल्या गेले आहे. रेल्वेत प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक सोई सुद्धा केलेल्या आहेत. परंतु, काही नागरिक या शासकीय मालकीच्या वस्तूची चोरी करतात. आणि पर्यायाने नागरिक प्रशासनास दोष देतात. आशीच एक चोरोची घटना नागपूर रेल्वे स्थानकावर निदर्शनात आली आहे. 

    वारंवार नळ चोरीच्या घटनांमुळे चोराला पकडण्यासाठी  सीआरपीएफच्या जवानांनी  रेल्वे स्टेशनवर साध्या वेशात राहण्याचा निर्णय घेतला. त्यांचा तो निर्णय योग्य ठरला. सीसीटीव्ही फुटेज मध्ये लक्षात आले की एक इसम वारंवार स्वच्छतागृहात जातो. त्याची शंका जवानांना आल्यानंतर आरपीएफ जवानांनी त्याला थांबवून त्याची विचारपूस केली. तेव्हा तो सगळ्या प्रश्नांची उत्तरे उडवाउडवीची देत होता. त्याच्यावर शंका घेत जवानांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ नळाच्या तोट्या मिळाल्या. त्या इसमाचे नाव सिकंदर असून त्याच्या जवळून  चक्क  ५५  नळाच्या तोट्या जप्त करण्यात आल्या आहे. तर आतापर्यंत २०० पेक्षा अधिक नळ चोरल्याची माहिती पुढे आली आहे.
    सिकंदर जहीर खान असे त्याचे संपूर्ण नाव असून तो आपल्या अमली पदार्थांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी या नळाच्या तोट्या चोरत असे. त्यातून मिळालेल्या पैशातून तो आपले व्यसन पूर्ण करीत होता. तरी त्याने कोणाकोणाला हे चोरलेला नाळ विकले याचा तपास आरपीएफचे जवान करीत आहे.